पान:प्रमाणशास्त्र.pdf/172

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


हक्काचे मजकूर.

१६३

नात्याने कळल्या असतील त्या सांगण्यास त्याजवर सक्ती करवत नाही.

 ३०२. याच प्रमाणे एकाद्या दस्तऐवजांत लिहलेली रक्कम, किंवा केलेली खाडाखोड, ही एकाद्या आटर्नीस किंवा वकिलास त्याचा अशिलाने न कळवितां, चौकशीचा वेळी स्वतांचा पाहण्यावरून त्यास कळन येईल, तर त्याविषयी साक्ष देण्यास त्यास प्रव्यवाय नाही. आपल्या अशिलाचे नाव उघड करण्यास आणि त्याजला ओळखून सांगण्यास, किंवा त्याचे अक्षर ओळखण्यास, त्याजवर जोर चालेल; किवा गौण पुरावा मान्य करण्यास्तव आपल्या अशिलापासून जो दस्तऐवज त्याजपाशी आला असेल, तो त्याचा कबजांत आहे किंवा नाही, हे सांगण्यास त्याजवर सक्ति होईल.त्याच प्रमाणे त्याजला आपल्या अशिलाचा वतीने प्रतिपक्षकाराकडून मजकूर कळले असतील ते,किंवा त्याणे प्रतिपक्षकाराला मकर सांगितले असतील ते, सर्व उघड केले पाहिजेत.

 ३०३. अशिलाचा आणि वकिलाचा दरम्यान जी बोलणी व्हावयाची, ती जांचा मारफतीने अवश्य झाली पाहिजेत असे मनुष्य, म्हणजे, दुभाषे, मुखत्यार दसरे त्या संबंधाचे लोक, यांस तो हक्क लागू होतो, आणि तसेच वकिलाचे कारकून किंवा त्या त्या ठिकाणचे वकिलाचे मुखत्यार यांसही तो हक्क लागू पडतो.

 एकाद्या साक्षीदारास, आपल्या जमीनीवरील मालकी बदलचे दस्तऐवज हजर करणे जरूर नाही,