पान:प्रमाणशास्त्र.pdf/171

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१६२
हक्काचे मजकूर.

किंवा मुखत्यार, किंवा स्नेही, याजपाशी सांगितले. ल्या भरवशाचा मजकुरास हा हक्क लागू पडत नाही, किंवा पक्षकारांचा दरम्यानचा पत्रांस, किंवा कायद्याविषयी सला देणारास त्याचे अनुमत घेण्याकरिता एकाद्या पक्षकाराने किंवा एकाद्या पक्षकारास लिहिलेल्या पत्रांस तो लागू पडत नाही. तसेच हा हक्क पुढील प्रकारांस लागू पडत नाही. ते असे जेव्हां( काही फी दिलेली नसेल असे असेल तरीही) एकाद्या वकिलास वकालत नामा देण्या पूर्वी, किंवा त्या वकालात नाम्याचे कारण संपल्यानंतर, त्याजला मजकूर सांगितला असेल तेव्हां, किंवा त्याची स्नेहाचा नात्याने मात्र सला घेतली असत्ये तेव्हां, किंवा जेव्हां कायद्याची सला देणाराचा धंद्याशी विचारलेल्या मजकुराचा संबंध नसतो, किंवा त्या मजकुराचा तसा विचार करण्याची जरूर नसत्ये, तेव्हां,जसें कैदीस फाशीची शिक्षा जाल्यास आपण मोठी रकम देऊ, असें आपल्या वकिलास सांगितले होते, हा मजकूर, किंवा अशिलाने करून दिलेल्या दस्तऐवजावर आपली साक्ष घातल्यावरून त्या दस्तऐवजावर सही झाल्याबाबद शाबिती करण्यास्तव तो कायद्याची सला देणारा साक्षीत बोलावण्यास पात्र होतो, अशा प्रकारचा मजकूर. परंतु असे दिसून येते, की या शेवटील बाबतींत त्या कायद्याविषयी सला देणारास त्या दस्तऐवजाचा पूर्वीची तयारी, किंवा जुळणी, किंवा मागाहून केलेला नाश, या विषयींचा हकीकती वकीलपणाचा