पान:प्रमाणशास्त्र.pdf/170

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


हक्काचे मजकूर.

१६१

तो हजर करण्याचा जरूरीची त्यास माफी आहे. परंत जर पक्षकार स्वतः साक्ष देण्यास सिद्ध होईल, तर तो लेख जो पक्षकार आणविण्यास इच्छित असेल त्याचा कज्जास लागू असल्यास हजर केला पाहिजे.

 ३००. सदरहु आक्याचे कलम २४ यांत असे लिहिले आहे, की "बारिस्टर, किंवा आटर्नी, किंवा "वकील, आपल्या धंद्याचे काम करीत असतां त्यास "कळानें मजकूर सांगितला असेल, तो मजकूर, आपल्या धंद्याचा रीतीने त्याणे कुळास सला दिली असेल ती सला, किंवा आपल्या कुळाचा कोणत्याही "दस्तऐवजांतील मजकूर आपल्या धंद्याचे काम करीत असतां यास माहीत झाला असेल, तो मजकूर, "आपल्या कुळाचा अनुमतावांचून त्याणे उघड करूं "नये; हा हक्क कुळाचा आहे, आणि मुकदम्यांतील "कोणताही पक्षकार मुकदम्यांत आपल्या खुशीने "साक्ष देईल, तर त्याणे आपला हा हक्क सोडला असें "समजावें, आणि सदरहुपैकी कोणतीही गोष्ट मुकदम्यास लागू असेल आणि कुळाचा हक्क नसता तर " ती उघड करणे बारिस्टरास, किंवा आटर्नीस किंवा "वकिलास अवश्य असते, ती गोष्ट बारिस्टराने किंवा "वकिलाने उघड करण्याविषयी त्या पक्षकाराने अनुमत दिले आहे असे समजावें; आणि बारिस्टर, किंवा आटर्नी, किंवा वकील याची जबानी घेतील ते. "व्हां त्यास अशा प्रकारची कोणती ही गोष्ट उघड "करणे अवश्य आहे."

 ३०१. धर्मोपदेशक, किंवा वैद्य, किंवा कारकून,