पान:प्रमाणशास्त्र.pdf/169

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१६०
हक्काचे मजकूर.

हक्क लागू केला आहे; परंतु तो मजकूर ती एकत्र राहत असतां झालेला असला पाहिजे; आणि यास्तव त्यांचा लग्नापूर्वी एकाद्या सांगितलेल्या मजकुरास हा हक्क लागू होत नाही. ती एकत्र राहत असतां सांगितलेल्या मजकुरासंबंधी हक्क मरणाचा योगेंकरून किंवा घटस्फोटाचा योगेंकरून लग्नाची तूट पडल्यानंतरही चालतो असे दिसते.

 २९५. या प्रमाणे नवराबायकोचा दरम्यानचा मजकुराविषयीं जो हक्क कायद्याने दिला आहे, तो, साधारणतः कुटुंबांची स्वस्थता राहण्यास नवराबायकोचा दरम्यान परस्परांवर पूर्ण विश्वास असला पाहिजे, यास्तव दिला आहे, हे सांगणे विशेष अवश्य आहे असे नाही.

 २९८. कायद्यासंबंधी सला देणारा (म्हणजे वकील ) व अशील यांचा दरम्यान जे मजकूर एकमेकांत खेळतात ते उघडकीस आणण्याविषयी काययाची मनाई आहे, हा हक्काचा मजकुराचा दुसरा प्रकार आहे. काम चालविणारा वकील जे काम चालवीत असेल, त्यासंबंधी त्याचा व अशिलाचा दरम्यान जी बोलणी चालतात ती हक्काची आहेत, असें ठराविले आहे; कारण, अशी बोलणी पूर्ण खुलाशाने होण्याविषयी उत्तेजन द्यावे ही उत्तम राजनीति आहे असे मानिले आहे.

 २९९. सन १८५५ चा आक्ट २ कलम २२ वरून एकाद्या पक्षकाराचा व त्याचा वकिलाचा दरम्यान जो पत्रव्यवहार किंवा भरवशाचा लेख झाला असेल,