पान:प्रमाणशास्त्र.pdf/168

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


हक्काचे मजकूर.

१५९

घेतल्याने किंवा मान्य करण्याची परवानगी दिल्याने अधिक मोठी खराबी होईल, असे मानले आहे

.  २९५. जे मजकूर उघडकीस न आणण्याविषयी हक्क आहे, त्यांतील पहिला प्रकार, नवरा आणि बायको यांचा दरम्यानचा मजकुराविषयी आहे. सन १८५५ चा आक्ट २ कलम २० यांत असे लिहिले आहे, की “ सर्व दिवाणी मुकदम्यांत नवराबायको, " एकमेकांचा तरफेनें, किंवा एकमेकांविरुद्ध, साक्ष " देण्यास लायक आहेत असे समजावें; परंतु असें " ठरविले आहे, की नवराबायको एकत्र असतां त्यांणी एकमेकांस सांगितलेला मजकूर त्यांचा हक्काचा " आहे, असे समजावे; आणि जाणे तो सांगितला " असेल, त्याचा अनुमतावांचून तो उघड करूं नये, " परंतु नवऱ्याबायकोमध्येच मुकदमा चालू असेल, " आणि त्या मुकदम्यांतील तकरारीसंबंधी तो मजकूर असेल, तर मात्र सांगणाराचा अनुमतावांचून " उघड करावा."

 २९६. नवराबायकोचा दरम्यानचा खरोखर भरवशाचे मजकूर मात्र हक्काचे असतात इतकेच नाही, परंतु त्यांचा दरम्यान जी बोलणी होतात ती कोणत्याही प्रकारची असली तरी सर्व त्याच प्रमाणे हकाची असतात; आणि जा कज्जांत तिरहाइताचा नफानुकसानीचा संबंध असतो त्या कन्नांत, आणि वर सांगितलेल्या कलमाचा शेवटी जो अपवाद लिहिला आहे तो खेरीज करून बाकी जा सर्व मुकदम्यांत नवरा किंवा बायको पक्षकार असतात त्या कज्जांस,हा