पान:प्रमाणशास्त्र.pdf/166

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


साक्षीदाराने जबाब न देणे.

१५७

याविषयी संशय आहे असे दिसते. त्या प्रश्नांतील गैरआब्रूचा हकीकती विशेष नूतन असल्यामुळे त्या साक्षीदाराचा साक्षीवर जो भरवसा ठेवावयाचा त्यांत त्या हकीकतो कांहीं व्यत्यय आणण्यासारिख्या आहेत किंवा कसे, याविषयी विचार करणे न्यायाधीशास योग्य आहे.

 २९०. उत्तर न देण्याचा हक्क साक्षीदाराचा आहे, पक्षकाराचा नाही. यास्तव तो हक्क एकाद्या पक्षकाराचा वकिलास चालविण्याचा अखत्यार नाहीं.

 २९१. आणि एकादा प्रश्न खासगी बाबतीसंबंधी आहे, किंवा गैरलागू आहे, या सबबेवरून साक्षीदार याजला प्रश्नाचे उत्तर देण्यास हरकत घेतां येत नाही, असा न्यायाचा साधारण नियम आहे; परंतु हक्काचा एकाद्या विशेष सबबेवरून उत्तर न देतां येईल.

 २९२. सन १८५५ चा आक्ट २ कलम ३३ यांत असे लिहिले आहे, की “तुजवर 'फेलनीची " म्हणजे अघोर अपराधाची किंवा 'मिडिमीनरची " म्हणजे हलक्या अपराधाची शाबिती झाली आहे, किंवा नाही असा प्रश्न कोणत्याही खटल्यांतील " साक्षीदारास विचारण्याचा अखत्यार आहे; आणि "विचारल्यानंतर तो साक्षीदार ती गोष्ट नाकबूल जाईल, किंवा उत्तर देण्यास नाही म्हणेल, तर, सदरहु प्रकारचा गुन्ह्याचा शाबितीचा ठरावाचा पुरावा "करण्याचा अधिकार विरुद्ध पक्षकारास आहे."