पान:प्रमाणशास्त्र.pdf/165

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१५६
साक्षीदाराने जबाब न देणे.

"दिली असेल, तिजबदल त्यास शिक्षा करण्याकरितां "मात्र त्या उत्तराचा उपयोग करावा."

 २८६. सदरील कलम मुद्यास लागू बाबतीचा प्रश्नाविषयी आहे, हे ध्यानात येईल; यास्तव यावरून असे अनुमान करितां येईल, की इंग्लंडांतील साधारण कायद्या प्रमाणे अशा सबबेवरूत मुद्याचा बाबतीत जो प्रश्न लागू नसेल त्याचे उत्तर देणे साक्षीदारना कबूल करूं शकेल.

 २८७. आपल्या जबाबावरून दिवाणी फिर्यादीस किंवा पैशाचा नुकसानास आपण पात्र होऊ, किवा तेणेकरून आपणावर कर्ज बसेल, या सबबेनें साक्षीदार याजला मुद्याचा लागु बाबतीविषयी प्रश्नाचे उत्तर देणे नाकबूल करितां येत नाही असे दिसते.

 २८८. ज्या प्रश्नाचे उत्तर दिल्याने साक्षीदाराची परंपरासंबंधाने मात्र अप्रतिष्ठा होण्याचा झोंक असतो, व्या प्रश्नाचा जबाब देण्याविषयी साक्षीदारावर सक्ती करण्याचा अखत्यार आहे; आणि काही प्रश्न चौकशीचा मुद्यास लागू असतील तर त्यांचे उत्तर दिल्याने प्रत्यक्ष आपली आब्रू हलकी होईल, अशी त्या साक्षीदाराची सबब उत्तर न देण्याविषयी चालणार नाही असे दिसते.

 २८९. मुद्यास प्रत्यक्ष लागू प्रश्न नमून साक्षीदाराचा आब्रूचाच मान्यतेची पारख करण्या करिता तो घातला असता, त्याचा जबाब दिल्याने त्याची आबू साक्षात् हलकी होत असल्यास त्याजला तो जबाब देणे अवश्य पाडतां येईल, किंवा कसे,