पान:प्रमाणशास्त्र.pdf/164

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


साक्षीदाराने जबाब न देणे,

"दिला होता, याविषयी आणखो शाबिती वांचून प्रथमदर्शनी पुरावा आहे, असे समजावे; आणि जो "प्रसंग असेल तो दाखल्यांत, किंवा जबानीत, किंवा "इकरारांत लिहावा."


जबाब न देण्याविषयी साक्षीदाराचा हक्क.

 २८५, सन १८५५ चा आक्ट २ कलम ३२ यांत असे लिहिले आहे की, “कोणत्याही मुकदम्यांतील, किंवा दिवाणी अथवा फौजदारी कामांतील "बाबती संबंधी प्रश्नाचे उत्तर साक्षीदाराने दिले अस. "तां तो गुन्ह्यांत सांपडेल, किंवा गुन्ह्यांत सांपडण्याजोगें साक्षात् अथवा पर्यायाने त्यांत उत्तराचे धोरण "आहे, अथवा त्या उत्तरापासून साक्षीदार कोणत्याही प्रकारचा गुन्हेगारीस पात्र होईल, किंवा "गुन्हेगारीस पात्र होण्याजोगें साक्षात् किंवा पर्यायाने त्या उत्तराचे धोरण आहे, अशा सबबेवरून "त्या प्रश्नाचे उत्तर न देण्याचे साक्षीदाराचे म्हणणे "कबूल करूं नये; परंतु असे ठरविले आहे, की साक्षीदारापासून बलात्काराने सदरहु प्रकारचे उत्तर "घेतले असता त्या उत्तरावरून त्यास धरण्यास, किंवा "त्यावर काम चालविण्यास, तो पात्र होतो असें समजु नये, किंवा कोणत्याही फौजदारी खटल्यांत ते "उत्तर त्या साक्षीदाराविरुद्ध पुराव्यास घेऊं नये; परंतु “सदरहु प्रमाणे जबानी देन्ये वेळेस बुध्या खोटी साक्ष