पान:प्रमाणशास्त्र.pdf/163

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१५४
साक्षीदारांस खोटा पाडणे.

१८५५ चा आक्ट २ कलम ३० यावरून झाला आहे. ते कलम येणेप्रमाणे साक्षीदाराची जबानी ज्या पक्षकाराचा सांगण्यावरून घेत असतील, त्या “पक्षकारास त्या साक्षीदाराचा प्रामाणिकपणाची "परीक्षा करण्याकरिता, सदरहु प्रकारचा कोर्टाचा, "किंवा मनुष्याचा परवानगीने उलटपालट सवाल "करण्याचा अधिकार आहे, त्या पक्षकाराचा सांगण्यावरून त्या साक्षीदारास बलाविले नसते तर, जा "रीतीनें तो पक्षकार त्यास सवाल करिता त्या रीतीने "त्याणे उलटपालट सवाल करावे; आणि साक्षीदाराने "पूर्वी जबानी दिली तिशी आणि त्याचा हल्लीचा जबानीशी फरक आहे हे शाबीत करण्याची त्या पक्षकारास मोकळीक द्यावी."

 २८४. त्याच आक्टाचा ३१ व्या कलमाअन्वयें, " जा वेळी एकादी गोष्ट घडली त्याच वेळी "किंवा त्या सुमारास, त्या गोष्टीविषयी अशा साक्षी "दाराने, त्या गोष्टीची चौकशी करण्यास कायद्या "प्रमाणे लायक अम्मलदारा पुढें पूर्वी जबानी दिली "असेल, तीवरून त्या साक्षीदाराचा साक्षीस प्रत्यंतर घेता येते; आणि या करितां कोणत्याही कोर्टाचा, किंवा माजिस्टाचा, किंवा कमिशनराचा, किंवा ठगी अथवा डांका मोडण्याकरितां नेमलेल्या सपरिटेंडापढ़ें झालेल्या जबानीची, त्या त्या अम्मलदाराचा सहीशिक्यानिशी खरी झालेली अशी त्या जबानीची नकल, ही "सदरहु जबानी, किंवा इकरार दिला होता, "व तो अमुक वेळी, अमुक ठिकाणी, व अमुक प्रसंगी