पान:प्रमाणशास्त्र.pdf/162

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


साक्षीदारास खोटा पाडणे.

१५३

"करूं देण्याचा पूर्वी तो कागद साक्षीदाराचा हातांत "देण्याविषयी न्यायाधीशाने साधारणतः आग्रह धरावा हे उत्तम आहे."

 २८१ ३ रा एकाद्या साक्षीदारास लांच दिला आहे, किंवा साक्ष देण्या करितां तो दुसऱ्यास लांच देत होता, असे, किंवा जा पक्षकाराविरुद्व त्याणे साक्ष दिली त्या पक्षकारास दुश्मनीची किंवा मूड घेण्याची भाषणे बोलला, असे दाखवूनही त्या साक्षीदारास खोटा पाडतां येतो, हा प्रकार.

 २८२. एकाद्या पक्षकाराला आपल्या स्वतांचा साक्षीदारास खोटा पाडतां येईल किंवा कसे, या बाबतीत असा नियम आहे, की तो भरवशास योग्य नाही, अशी साधारण साक्ष देऊन त्यास खोटा पाडण्याची परवानगी मिळणार नाहीं; कारण जेव्हां कोणी पक्षकार साक्षोस बलावितो, तेव्हां तो साक्षीदार मान्यतेस योग्य आहे, किंवा किमानपक्ष मान्यतेस सर्वथा अयोग्य होण्या जोगा खराब नाही, असे तोच पक्षकार कोर्टास दाखवितो.

 असे आहे तथापि त्या साक्षीदारानें जा घडलेल्या गोष्टी सांगितल्या, त्या गोष्टी कजांतील बाबतीस लाग असल्या तर त्या साक्षीदाराने सांगितल्या होत्या तशा नाहीत, असे शाबीत करण्याकरितां दुसरे साक्षीदार आणण्याचा त्याजला अखत्यार आहे.

 २८३. आपल्या साक्षीदाराने पूर्वी दिलेल्या जबान्या पुराव्यास देऊन त्यास पक्षकाराचानें खोटा पाडवेल किंवा नाही, या बाबतीचा निर्णय, इ. स.