पान:प्रमाणशास्त्र.pdf/161

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१५२
साक्षीदारास खोटा पाडणे

पूर्वीचा मजकूर साक्षीदार पूर्णतेनें कबूल करीत नसल्यास मात्र, किंवा तो मजकूर आपणास आठवत नाही असे लिहून देत असल्यास मात्र, अशा पूर्वीचा. मजकूराविषयी साक्ष घेण्यांत येत्ये.

 २७९. याच प्रकारे सन १८५५ चा आक्ट २ कलम ३४ यांत लिहिले आहे, की "खटल्याचा बाबती प्रकरणी साक्षीदाराने जबानी पूर्वी स्वतः लिहून "दिली असेल, किंवा त्याची जबानी पूर्वी लिहून घेतली असेल, ती त्यास न दाखवितां तिजविषयी त्यास उलटपालट प्रश्न करण्याचा अधिकार आहे; "परंतु त्या लेखावरून त्या साक्षीदाराचा बोलण्याचे "खण्डन करण्याचा इरादा असेल, तर खण्डनाचा पुरावा देण्यापूर्वी त्याचे खण्डन करण्या करितां त्या "लेखाचा जा भागाचा उपयोग करावयाचा असेल, "तो भाग लक्षात ठेवण्याविषयी त्यास सांगितले पाहिजे. असे ठरविले आहे, की इनसाफ होत अस"तां कोणत्याही वेळी आपणास पाहण्याकरितां तो "लेख हजर करण्यास सांगण्याचा अधिकार जज्जास "आहे; मग इनसाफाचा कामांत आपणास योग्य वाटेल त्याप्रमाणे त्या लेखाचा उपयोग करण्याचा अधिकार त्यास आहे."

 २८०. या कलमाविषयीं नान याणे असे लिहिले आहे, की "जा मुकदम्यांत साक्षीदाराचा स्मरणाची "पारख करण्याचा उद्देश असतो, ते खेरीज करून "इतर मुकदम्यांत न्यायाधीशाने सदरील विशेष ठरावाप्रमाणे वर्तावे, आणि दस्तऐवजावरून प्रतिप्रश्न