पान:प्रमाणशास्त्र.pdf/160

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


साक्षीदारास खोटा पाडणे.

१५१

शाबितीविषयी जेथे सन १८५५ चा आक्ट २, कलम ३३ अन्वये पुरावा घेतां येतो, तेथे मात्र विवक्षित घडलेल्या गोष्टीविषयींची साक्ष ग्राह्य आहे. एकाद्या साक्षीदारास खोटा पाडण्याकरितां अमुक घडलेल्या गोष्टीची चौकशी केली असतां, खटल्या बाहे. रील अनंत मुद्दे निघतील आणि तेणेकरून तसे करणे फार हरकत घेण्याजोगें होईल, म्हणून अशी चौकशी करू देत नाहीत.

 २७७. २ रा "त्याच साक्षीदाराने पूर्वीचा "प्रसंगी कधी मजकूर सांगितला असेल तो जी साक्षत्याणे साम्प्रत दिली आहे, तिशी पूर्वापरविरुद्ध . "आहे असे दाखविणे हा प्रकार परंतु मुकदम्यास जी साक्ष लागू असेल तिजविषयी मात्र "हा प्रकार लागू होतो; कारण मुद्याबाहेरील "गोष्टीविषयी साक्षीदाराचे खण्डन करितां येत "नाही."

 २७८. अशा साक्षीविषयी पुरावा हजर करण्यापूर्वी प्रथम अमुक वेळी अमुक मनुष्याशी न्याणे खरोखर अमुक मजकूर सांगितला होता की काय, ते सांगण्याची, आणि, शक्य असल्यास, फेरप्रश्नांवरून पर्वीचा मजकूर कोणत्या रीतीने व कोणत्या हकीकतीने लिहून दिला याची समजूत करून देऊन आपल्या हल्लीचा साक्षीशी त्याचा मेळ घालून घेण्याची, किंवा तो मजकूर आपल्या हल्लींचा साक्षीशी खरोखर विरुद्ध नाही असे कोणत्याही प्रकारे दाखविण्याची, त्या साक्षीदारास सवड दिली पाहिजे, आणि