पान:प्रमाणशास्त्र.pdf/159

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



१५०
साक्षीदारास खोटा पाडणे.

णाच्या साक्षीदारांचा जबान्यांनी करितां येते. परंतु चालू कामास अगदी गैरलागू मजकुराविषयी एकाद्या साक्षीदारास साधारणतः प्रश्न करूं नये. आणि जर न कळून त्याजला गैरलागू प्रश्न विचारिण्यांत आला, तर त्याचे उत्तर त्या बाबतीविषयी निश्यायक समजले पाहिजे, म्हणजे, इतर साक्षीदारांचा साक्षीने त्याचे खण्डन करितां येत नाही.

 २७५. एकादा साक्षीदार स्वतः मान्यतेस योग्य नाही, असे पुराव्यावरून दाखविणे,हे साक्षीदारास खोया पाडणे होय; आणि साक्षीस खोटापाडणे; हे दुसरे साक्षीदार हजर करून एकाद्या साक्षीदाराचा जबानीचे खण्डन करणे याहून भिन्न आहे, हे सहज लक्षांत येईल.

 २७६. प्रतिपक्षकाराचे साक्षीदार खोटे पाडण्याचे तीन मार्ग आहेत, असें बेस्ट याणे लिहिलेले आहे. ते असे:

१ ला सत्यप्रतिज्ञेवरही त्याणे जबानी दिली असतां, तो साक्षीदार भरवसा ठेविण्यास योग्य नाही, असे लिहून देणार मनुष्याचा साक्षीने खोटी पाडणे, हा प्रकार. आतां एथें ही गोष्ट लक्षात ठेविली पाहिजे, की त्या साक्षीदाराचा खरेपणाचा साधारण लौकिकाविषयी मात्र अशी चौकशी असली पाहिजे; विवक्षित घडलेल्या गोष्टीविषयींचा पुरावा अग्राह्य आहे; परंतु साक्षीदाराने अघोर अपराधाची व हलक्या अपराधाची शाबिती आवृणावर झाल्याचे नाकबूल केले असल्यास, त्या