पान:प्रमाणशास्त्र.pdf/16

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



मुद्याचा तत्त्वाची शाबिती.

कोर्टाने फैसल्ला करूं नये. परंतु जे क्षुल्लक फरक सामनेवाल्यास चुकविण्याजोगे व चकविण्याजोगे नाहीत त्यांकडे दुर्लक्ष करण्याची वहिवाट आहे.

 जर कायद्याने दंड्य अपराध किंवा वाजवी हक्क शाबीत करण्यापुरत्या घडलेल्या गोष्टी शाबीत असतील,तर त्या चार्जाची किंवा हक्काची पूर्ण व्याप्ति किंवा महत्त्व शाबीत करणे जरूर नाही. यास्तव जा म्हणण्याचा कल अपराधाचे फक्त स्वरूप मोठे दाखविण्याचा किंवा नुकसानी वाढविण्याचा आहे,त्या म्हणण्याची शाबिती करण्याची जरूर नाही.उदाहरण, जर खुनाचा चार्जात अकस नाशाबीत असेल,परंतु बाकी सर्व अवश्य गोष्टींची शाबिती होईल,तर, आरोपित मनुष्य, मनुष्यवधाचा गुन्हेगार ठरविला जावा. आणि दुसऱ्याची अबरू घेण्यासारखा मजकूर लिहून व छापून प्रसिद्ध केला म्हणून कोणी मनुष्यावर आरोप आणिलेला असता, त्याजला छापवून प्रसिद्ध केल्याविषयींचा इतकाचही अपराधी ठरविता येईल. त्याचप्रमाणे, एकाद्या स्त्रीचा बद उपयोग व संभोग करण्याचा हेतूनें, तिच्यावर हल्ला केल्याचा चार्ज असता, त्या हेतूंतून एकाची शाबिती झाल्यास बस आहे. त्याचप्रमाणे, जेलर व पोलीस ऑफिसर इत्यादिकांवरील, त्यांणी आपल्या कैदेतून कोणी मनुष्यास जाणूनबुजून पळू दिल्याबाबदचा खटल्यांत, त्यांचा सुस्तीने पळू देणे, इतकें दाखविणे बस आहे.