पान:प्रमाणशास्त्र.pdf/१५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


मुद्याचा तत्त्वाची शाविती.

 चार्जाला किंवा दाव्याला अवश्य गोष्टींची वर्णने शाबीत करण्याविषयीं खटले चालविणारा अथवा वादी याजवर सक्ति करणे, यांत त्याजवर जुलूम होतो असें नाहीं; कारण, की ती वर्णने त्याणे खुषीने लिहिली आहेत; आणि ती लिहिलेली वर्णने एकीकडे ठेविली असतां पुष्कळ ठिकाणी प्रतिवादीला चुकविला असे होईल.

 १३. फौजदारी काम चालविण्याचा रीतीविषयी नवीन कायद्यांतील २४४ व २४७ कलमांत, जा कैदीची चौकशी होत असेल त्या कैदीवरील चार्ज खटल्यांतील गोष्टींशी मिळून येण्याजोगा फिरविण्यास,नजरेस असल्यास ती चौकशी पुढे चालविण्यास,अथवा नवा जबाब अथवा आरोपित मनुष्यास किंवा कोडतास पाहिजे असेल तो नवा पुरावा घेण्यास्तवकहाऊ चौकशी महकूब करण्यास, किंवा पुनः चौकशीचा

हुकूम करण्यास, सेशन जज्जास अधिकार दिला आहे;परंतु चार्ज दुरुस्त केलेल्या कोणत्याही खटल्यांत आरोपित मनुष्याने फिर्यादी तर्फेचा झालेल्या कोणत्याही साक्षीस फिरून बोलावून उलट सवाल करावे.सन १८५९ चा आक्ट ८ कलम १४१ अन्वये दिवाणी मुकदम्यांतील मुद्दे दुरुस्त करण्याचा अधिकार आहे.

 १४. जसे जाबजबाब व शाबिती झाली असेल,त्याचप्रमाणे जिल्ह्यांतील कोडतांनी अवश्य फैसला केला पाहिजे; आणि तयार केलेल्या कज्जाचे तत्त्व शाबीत न झाल्यास, एकादी केवळ भिन्न बाब, जी पुराव्यावरून शाबीत झाली असेल, तिचा आधाराने