पान:प्रमाणशास्त्र.pdf/१७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



पुरावा मुद्याला धरून असावा.

 १५. पुरावा मुद्याला धरून असला पाहिजे,असा दिवाणी व फौजदारी या दोन्ही प्रकारचा कजांत साधारण नियम आहे. सामनेवाल्या पक्षकाराने कबूल केलेले मुद्दे, किंवा जाबजबाबांत घुसवून दिलेल्या अप्राकरणिक गोष्टी, यांची शाबिती करणे अवश्य नाही; परंतु, सर्व मुद्याचा गोष्टी कबूल केल्या नसल्यास, त्या शाबीत केल्या पाहिजेत आणि, दुसऱ्या पक्षी, पक्षकार यास कज्जाबाहेरचे मुद्दे शाबीत करण्याची परवानगी साधारणतः देण्यांत येत नाही.

 १६. याच नियमामुळे, जा बाहेरचा गोष्टींविषयों प्रत्यक्ष वाद नसतो, त्या गोष्टींवरून मुद्याचा गोष्टींचा खुलासा किंवा शाबिती होणे नसल्यास, त्या बाहेरचा गोष्टींबाबद पुरावा घेण्यांत येत नाही. या नियमाला दर्शनीय अपवाद पुष्कळ असून खरे थोडेआहेत;ते मुख्यत्वेकरून फौजदारी कजांत आढळतात.

 १७. खरे बोलण्याविषयी साक्षीदाराचा साधारण अब्रूचा किंवा प्रशंसेचा पुरावा ग्राह्य आहे.कारण ती बाबत मुद्यास कधीं गैर लागू असू शकत नाही.

 १८. जेव्हां चौकशीचा मुद्दा अब्रविषयी असेल,तेव्हां मात्र पक्षकाराचा साधारण अब्रविषयी पुरावा बहुधा ग्राह्य आहे. अब्रू घेणे इत्यादि बाबतीबदल नुकसानीचा कित्येक दिवाणी दाव्यांत, नुकसानीची रकम ठरविण्याकरितां वादीचा अब्रूचा विचार व्हावा;