पान:प्रमाणशास्त्र.pdf/158

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


साक्षीदारास खोटा पाडणे.

१४९

"पाहण्याचा अधिकार आहे, आणि त्याची मर्जी "असल्यास त्याणे साक्षीदारास त्याविषयी उलटपालट सवाल करावे." तो लेख किती वेळाचा आंत झालेला असला पाहिजे, याविषयी सदरील कलमांत खचित लिहिलेले नाही, आणि या गोष्टीविषयी फिलिप्स् याणे असे लिहिले आहे, की समकाली लिहून ठेविलेले टिपण कित्येक साक्षीदारांस जितकें उपयोगी पडेल, त्यापेक्षां घडलेल्या गोष्टीनंतर फार अवकाशाने लिहून ठेविलेले टिपण, इतर साक्षीदारांस फारच उपयोगी पडेल, असेंही होऊ शकेल.

 २७२. सदरील आक्याचा ४६ व्या कलमांत असे लिहिले आहे, की “ दस्तऐवज पाहून आठवण " करण्याचा अधिकार साक्षीदारास जा प्रसंगी असेल, त्या प्रसंगी कोर्टाचा परवानगीने तशा दस्तऐवजाची नकल पाहण्याचा अधिकार त्यास आहे; " परंतु अशा प्रसंगी असल दस्तऐवज हजर न होण्याचे पुरते कारण आहे, अशी खातरी सदरहु प्रकारचा कोर्टाची किंवा मनुष्याची झाली पाहिजे."

 २७३. साक्षीदार आंधळा असल्यास, त्याची आठवण ताजी करण्याकरितां तो लेख त्याजला वाचुनच दाखविला पाहिजे.


साक्षीदारास खोटा पाडणे

.

 २७४. चौकशीस लागू बाबतीविषयी एकाद्या साक्षीदाराचा जबानीचे खण्डन, त्याविरुद्ध साक्षी दे.