पान:प्रमाणशास्त्र.pdf/156

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


आठवण ताजी करणे.

१४७

“साक्षीदारास आठवण असेल, तर तो प्रकार."३ रा जेव्हां साक्षीदाराचा मनांत लेखांत लिहिलेल्या

"घडलेल्या गोष्टीविषयी, किंवा लेखाविषयी लेख "पाहून आठवण होत नाही, परंतु त्यांतील कांहीं मजकूर असल आहे असें तो लेख पाहिल्यावर मनांत येऊन त्यावरून त्याचा बुद्धीची "खात्री होऊन, त्या खातगेवरून विवक्षित घडलेल्या गोष्टीविषयी शपथ करण्यास तो शक्तिमान् होता, तो प्रकार. उदाहरण,एकाद्या पेढीवाल्याचा कारकुनास जा हुंडीवर त्याचे "अक्षर असून तेणेकरून ती हुंडी आप"ल्या हातातून गेली अशी त्याला माहिती असत्ये, परंतु त्या गोष्टीविषयी, किंवा त्या हुंडीवर आपण काही लिहिल्याविषयी त्याजला "स्मरण नसते, अशा वेळी त्यास ती हुंडी दाखवून त्याची साक्ष घेतात, तो प्रकार. "

 २६९. कोणताही प्रकार असला, तथापि साक्षीदारास घडलेल्या गोष्टीविषयी लेखाव्यतिरिक्त जरी आठवण नसेल, तरी त्या घडलेल्या गोष्टीविषयीं खातरीने बोलण्याविषयी साक्षीदार शक्तिमान् असला पाहिजे; आणि कोणताही प्रकार असला तरी, जा लेखावर साक्षीचा आधार असतो ती कबूल करण्यापू. वीं तो लेख कोडतांत आणणे अवश्य आहे, आणि प्रतिपक्षकाराने तो पाहून त्यावरून प्रतिप्रश्न करण्याचा त्याजला हक्क आहे. (सन १८५५ चा आक्ट २ कलम ४५).