पान:प्रमाणशास्त्र.pdf/154

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


साक्षीदारांचा जवान्या

१४५

साक्षीदारास प्रतिपक्ष्याने बोलाविले असले, तथापि जा पक्षकाराचा वतीने तो उत्कंठा दाखवीत असेल त्या पक्षकारास त्या साक्षीदारास सूचक प्रश्न करण्याची कोर्ट मनाई करील.

 २६६. एकाद्या साक्षीदारास प्रतिप्रश्न करणे ते कांहीं नियमित तजविजीने केले पाहिजेत; तीत जा मद्यांविषयीं तो खोटें बोलला असेल त्यांचा विचार मनांत आणून, आणि तो जी हकीकत सांगतो ती जर खरी असती तर जा गोष्टी तदाश्रित असण्याचा संभव असेल त्यांचा विचार करून, प्रतिप्रश्न केले पाहिजेत. प्रान्तांतील कोडतांमधील प्रतिप्रश्न करणारेवकोल कांही शिस्तीने प्रश्न न करितां पुष्कळ वेळ व औत्सुक्य वर्च करितात; ते असे, की ते नाना प्रकारचा मुद्यांविषयी सवाल विचारितात, त्यांचा कजाशी अगदी संबंध नसतो, अथवा कांही असला तर तो फारच थोडा असतो, आणि ते सवालही इतके निसकळीत असतात, की त्या प्रतिप्रश्नांपासून फारसा उपयोग होत नाही.

 २६७. ज्या गोष्टीविषयी साक्षीदारास प्रतिप्रश्न करण्यांत आले असतील, त्याच गोष्टीविषयी मात्र पाम फेरप्रश्न केले पाहिजेत, आणि मुख्य विचार न जा बाबती विचारण्याचा अधिकार असून ज्या विचारिल्या नसतील अशा बाबतीविषयीं नवीन प्रश्न करण्याचा अखत्यार नाही. परंतु मुख्य विचारपुशीत एकादी गोष्ट नजरचुकीने राहिली असल्यास, किं.