पान:प्रमाणशास्त्र.pdf/153

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१४४
साक्षीदारांचा जबान्या.

त्याची शाबिती करून त्याचे बोलणे अविश्वशनीय आहे, असे दाखविण्याकरितां दुसऱ्या एकाद्या साक्षी दाराची साक्ष घेणे केव्हां केव्हां अवश्य पडते; आणि अशा कज्जांत “पूर्वीचा साक्षीदार अमुक अमुक शब्द "बोलला की नाही, असे त्या साक्षीदारास स्पष्ट विचारण्याचा अखत्यार आहे, असे म्हटले आहे;परंतु जा जा प्रसंगाविषयी वाद पडला असेल, त्या त्या प्रसंगी तो पूर्वीचा साक्षीदार जे शब्द बोलला असेल, ते साधारण शब्दांनी सांगण्यास त्या साक्षीदारास सांगितल्या वांचून असा सूचक प्रश्न करूं नये, हा अभिप्राय त्याहून अधिक चांगला आहे असे दिसवें.

 २६५. जा नियमाने एकाद्या पक्षकाराला आपल्या स्वतांचा साक्षीदारास सूचक प्रश्न घालण्याची मनाई होऊन, विरुद्ध पक्षकाराचा साक्षीदारास सूचक प्रश्न घालतां येतात, त्याचे मुख्य कारण असे आहे, की जो पक्षकार साक्षीदारास बोलावितो त्याचा तरफेने त्याचे मन वळलेले असते, आणि विरुद्ध पक्षकारास प्रतिकूळ असते, असे साधारण अनमान आहे. परंतु पुष्कळ ठिकाणी असे उलट घडून येते, की एखादा साक्षीदार जा पक्षकाराने त्याजला बलाविलें असेल त्याचा विरुद्ध असून त्याचा प्रतिपक्ष्यास अनुअनुकूल असतो; आणि अशा प्रसंगी जेव्हां एकादा साक्षीदार आपल्या जबाबाने आपल्या पक्षकाराचा पक्षास आपण नाराजी किंवा प्रतिकूळ असल्याचे दर्शित करितो, त्यास, त्या पक्षकाराने सूचक प्रश्न करण्याची कोडत हमेशा परवानगी देते; आणि एकाद्या