पान:प्रमाणशास्त्र.pdf/152

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


साक्षीदारांचा जवान्या,

१४३

जेव्हां एकाद्या साक्षीदारास, त्याचा बुद्धीचा जडपणामुळे, किंवा प्रकृत विषयाचा भानगडीमुळे, साधारण प्रश्नांनी ठिकाणावर आणितां येत नाही, तेव्हां कारणपरत्वे असे प्रश्न विचारणे अवश्य होईल, आणि न्यायाधीशास अवश्य वाटेल त्या वेळेस सूचक प्रश्न करूं देण्याची हमेशा मुखत्यारी आहे.

 २६३. जे प्रश्न केवळ प्रस्तावनेचे असतात आणि जांचा जबाबांनी चौकशीतील मुद्यास व्यत्यय येत नाही, ते प्रश्न सूचक म्हणून त्यांस कधी हरकत घेण्यात येत नाही; आणि अप्रधान व प्रस्तावनेचा गोष्टींविषयी असे प्रश्न घातल्याने पुष्कळ वेळ वाचतो. याच प्रमाणे वेळ वाचवावा म्हणून, हजर असलेला एकादा मनुष्य, किंवा कांहीं जिनसा, जा त्याजकडून ओळखून काढवावयाचा असतील, त्या त्याला पाहण्यास सांगण्याची साधारण वहिवाट आहे; तथापि मोठ्या कज्जांत ओळखून काढण्याचा मनुष्य जेथे असेल, त्या ठिकाणी साक्षीदारास भवताले पाहून त्या मनुष्यास ओळखून काढायास सांगावें, आणि तसेच जिनसा ओळखावयाचा असतील, तर त्यां सारिख्या जवळजवळ दिसणाऱ्या इतर जिनसांतून त्या निवडून काढण्यास सांगणे, हे त्याहून चांगले आहे. ओळखावयाचा मनुष्य किंवा जिन्नस दाखवून देऊन, नंतर साक्ष घेण्यापेक्षा वरील दुसऱ्या रीतीने घेतलेली साक्ष विशेष उपयोगी होईल.

 २६४. एकादा साक्षीदार कोडताबाहेर कांहीं मजकूर बोलला तो बोलल्याचे नाकबूल जात असून