पान:प्रमाणशास्त्र.pdf/151

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



१४२
साक्षीदारांचा जबान्या.

आहे. “साक्षीदारास जी पाकरणिक आणि हांशि"लाची माहिती असेल ती सर्व कोडतापुढे आणि पंचांपुढे जाहीर करणे, हे 'मुख्य विचारपुशीचे काम आहे; शोधणे आणि छानणे, व तफावती सुधारणे, "व दुरुस्त करणे, हे काम प्रतिप्रश्नाचे आहे; समजावून देणे व गैरसमज दूर करणे, व नुकसानी दुरुस्त "करणे आणि साक्षीदारांस ताळ्यावर आणणे, हे "फेरमश्नाचे काम आहे."

 २६२. पक्षकारास आपल्या स्वतांचा साक्षीदारास सूचक प्रश्न घालण्याचा अखत्यार नाही. हा साधारण नियम आहे; परंतु प्रतिपक्षकाराचा साक्षीदारास प्रतिप्रश्न करितानां तसे प्रश्न त्याजला करण्याचा अखत्यार आहे. तथापि हा नियम कितीएक अपवादांस पात्र आहे, ते आतां सांगण्यांत येतील. अमुक जबाब जा प्रश्नावरून सुचविला जातो, किंवा सुचविण्या सारिखा कल असतो, किंवा जांत प्राकरणिक घडलेली गोष्ट असल्याने "हो" किंवा "नाही" असा साधा जबाब होऊ शकतो, तो सूचक प्रश्न होय. या शेवटल्या जातीचा सूचक प्रश्नाविषयी फिलिपस् याणे यथान्याय असे लिहिले आहे, की " एकाद्या साक्षीदारापासून अशा प्रकारे काढून "घेतलेली साक्ष, ही त्याची असल साक्ष नसत्ये, परंतु "ज्या घडलेल्या गोष्टी पक्षकार स्थापित करूं पाहत "असतो, त्याविषयी पूर्ण माहिती असणान्या वकिलाचा चातुर्याचा योगाने युक्तीने योजलेला व आकारास आणलेला व बनावलेला मजकूर असतो.' तथापि