पान:प्रमाणशास्त्र.pdf/150

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


साक्षीदारांचा जबान्या.

१४१

मनुष्यास जा रीतीने त्याची मनावर विशेष ग्रह होण्याजोगा असेल त्या रीतीने शपथ घेण्याचा हुकूम केला पाहिजे असे दिसते. (सन १८५९ चा आक्ट ८ कलम १७४, आणि सन १८६१ चा आक्ट २५ कलम ४३, २०४ व २५१ ).

 २६०. चौकशीचा आरंभी प्रकरणांतील सर्व पक्षकार हजर आहेत याविषयी खबरदारी ठेविली पाहिजे. जे साक्षीदार पक्षकार नसतात, त्यांना कोइतांतून बाहेर काढून त्यांचा जबान्या घेत्ये वेळी त्यांतून एकेकास आंत बोलावून त्याची जबानी घेतली पाहिजे, आणि जबानी घेतलेल्या साक्षीदारास जा साक्षीदाराची जबानी होणे असेल त्यापासून दूर ठेविले पाहिजे. साक्षीदारास बाहेर जाण्यास सांगितल्यानंतर एकादा साक्षीदार कोडतांत बसून राहील, तर त्या सबबेवरून त्या साक्षीदाराची साक्ष घेण्यास न्यायाधीशाचानें नाकबूल करवणार नाही असे दिसते; जर कोणी साक्षीदार ताकीद केल्यानंतर कोडतांत बमन राहिला, तर ही गोष्ट त्याचा मान्यते विरुद्ध होईल. आणि त्याणे केलेली अवज्ञा कोडताची बेअदबी समजून त्यास शिक्षा करितां येईल.

 २६१. प्रत्येक साक्षीदारास ज्या पक्षकाराने बोलाविले असेल, तो प्रथम त्यास सवाल करून विचारपम करितो, आणि तीस, 'मुख्य विचारपूस,' असे म्हणतात. नंतर विरुद्ध पक्षकार त्यास प्रतिप्रश्न करितो. आणि शेवटी, जा पक्षकाराने त्यास प्रथम बोलाविले त्याजला न्यास फेरप्रश्न करण्याचा अखत्यार