पान:प्रमाणशास्त्र.pdf/149

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१४०
साक्षीदारांचा जबान्या

येईल तेथें अमुक भाषा चालवावी, याचा त्या त्या इलाक्याचा सरकाराने निर्णय करावा; परंतु जी साक्ष इंग्रेजी भाषेत घ्यावयाची असेल, ती दिवाणी प्रकरणांतील पक्षकार कबूल असल्यास इंग्रेजीत लिहून घ्यावी, आणि फौजदारी कज्जांत जबान्या आपल्या हाताने, आपल्या भाषेत, किंवा इंग्रेजीत, किंवा जिल्ह्याचा भाषेत लिहून घेण्याविषयीं, न्यायाधीशास किवा माजिस्वेटास हुकूम करण्याचा अखत्यार इलाक्याचा सरकाराला आहे. जरून पडेल तर अशा ज. बानीचे भाषान्तर करून साक्षीदारास सांगितले पाहिजे, आणि फौजदारी मुकदम्यांत आरोपित मनुष्यास समजत असेल त्या भाषेत त्या जबानीचा अर्थ जरूर असल्यास त्यास सांगितला पाहिजे; परंतु आरोपित मनुष्याने मुखत्यार नेमिला असल्यास त्याजला ती जबानी जिल्ह्याचा नेहमीचा भाषेत अर्थकरून समजवू. न घेण्याचा मात्र अखत्यार आहे. (सन १८५९ चा आक्ट ८ कलम १७२, आणि सन १८६१ चा आक्ट २५ कलम १९५ तागाईत १९८, २४९, २६८ व ३६४).

 २५९, आरोपित मनुष्यास शपथ किंवा प्रतिज्ञा देऊ नये; परंतु साधारणतः पक्षकार आणि साक्षीदार यांचा जबान्या शपथेवर किंवा प्रतिज्ञेवर झाल्या पाहिजेत. सन १८४० चा आक्ट ५ यांत सांगितलेली प्रतिज्ञा रिव्रस्ती धर्माचा साक्षीदारास देण्याची अशुद्ध वहिवाट कितीएक कोडतांतून चालू आहे. तो आक्ट मुद्दाम हिदु किंवा मुसलमान लोकांकरितां ठरविलेला आहे, आणि त्या खेरीज अन्यधर्मातील