पान:प्रमाणशास्त्र.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुद्याचा तत्त्वाची शाविती. चार्जाला किंवा दाव्याला अवश्य गोष्टींची वर्णने शाबीत करण्याविषयीं खटले चालविणारा अथवा वादी याजवर सक्ति करणे, यांत त्याजवर जुलूम होतो असें नाहीं; कारण, की ती वर्णने त्याणे आपल्या खुपीने लिहिली आहेत; आणि ती लिहिलेली वर्णने एकीकडे ठेविली असतां पुष्कळ ठिकाणी प्रतिवादीला . चुकविला असे होईल. १३. फौजदारी काम चालविण्याचा रीतीविषयीं नवीन कायद्यांतील २४४ व २४७ कलमांत, जा कैदीची चौकशी होत असेल त्या कैदीवरील चार्ज खटल्यांतील गोष्टींशी मिळून येण्याजोगा फिरविण्यास, व नजरेस असल्यास ती चौकशी पुढे चालविण्यास, अथवा नवा जबाब अथवा आरोपित मनुष्यास किंवा कोडतास पाहिजे असेल तो नवा पुरावा घेण्यास्तव चौकशी महकूब करण्यास, किंवा पुनः चौकशीचा हुकूम करण्यास, सेशन जज्जास अधिकार दिला आहे; परंतु चार्ज दुरुस्त केलेल्या कोणत्याही खटल्यांत आरोपित मनुष्याने फिर्यादी तर्फेचा झालेल्या कोणत्याही साक्षीस फिरून बोलावून उलट सवाल करावे. सन १८५९ चा आक्ट ८ कलम १४१ अन्वये दिवाणी मकदम्यांतील मुद्दे दुरुस्त करण्याचा अधिकार आहे. १४. जसे जाबजबाब व शाबिती झाली असल, त्याचप्रमाणे जिल्ह्यांतील कोडतांनी अवश्य फैसल्ला केला पाहिजे; आणि तयार केलेल्या कज्जाचे तत्त्व शाबीत न झाल्यास, एकादी केवळ भिन्न बाब, जी पुराव्यावरून शाबीत झाली असेल, तिचा आधाराने