पान:प्रमाणशास्त्र.pdf/१४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


मुद्याचा तत्त्वाची शाबिती.

दरम्यान सर्व बाबतीत सर्वाशी पुरा मेळ असावा, असे प्रमाणशास्त्र सांगत नाही; परंतु ज्या सर्व गोष्टी दाव्यास किंवा चार्जास कायद्याप्रमाणे अवश्य असाव्या,असें पूर्वी सांगितले, त्यांचा मेळ असला पाहिजेः उदाहरण, चोरीचा चार्जीत, अने हातांत सोटा घेऊन आणि वेषपाल टून बचे घड्याळ चोरिलें, आणि घेऊन गेला, म्हणून लिहिले असेल, तर, दर्याफ्तीच्या वेळी अजवळ सोटा होता व त्याणे वेष पालट. ला होता, या गोष्टी चार्जापासून अगदी दूर आहेत म्हणून त्या मुळीच सोडून दिल्या जातील,व त्यांची शाबिती लागणार नाही.तसेंच अ,ब,च्या राहात्या वर

घरांत जबरीनें चोरी केल्याचा आरोप आणिला अ.च्या सल्यास, मालकांच्या नावांमध्ये तफावत असल्यास बिलकुल हरकत नाही, असे गृहीत आहे;कारण,ती अमुक घरांत केली असली पाहिजे,ही गोष्ट जबरीनेचोरी करण्याचा गुन्हयाचा अवश्भागनाही

 १२. परंतु वर्णनपर कथने त्या चार्जीत जरूर नसतांही जर लिहिली असतील, आणिजरती चार्जास अवश्य असलेली वस्तु किंवा मनुष्य यांची ओ. ळख पटविण्यास लागू होतील, तर त्यांची शाबिती केली पाहिजे. त्याचप्रमाणे, काळा घोडा चोरि. ल्याचा चार्ज, दुसऱ्या कोणत्या रंगाचा तो घोडा होता अशा पुराव्याने, मजबूद होणार नाही. आणि त्याचप्रमाणे चाजीत अवश्य म्हणून लिहिलेला मनुष्य ज्किंवा ठिकाण जर वर्णित असेल, तर ते नाव वगैरेची शाबिती झाली पाहिजे.