पान:प्रमाणशास्त्र.pdf/148

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


साक्षीदारांचा जवान्या.

१३९

पाल्हाळाचा रीतीने लिहून ठेवणे जरूर दिसल्यास तसे करावे. (सन १८६१ चा आक्ट २५ कलम २६७,२६८). " जर वर सांगितल्या प्रमाणे न्यायाधीशाला स्वतः " याद लिहिण्यास अडचण असली, तर ती अडचण "कोणती, हे त्याणे लिहून ठेविले पाहिजे, आणि "ज्या मुकदम्यांत अपील नाही त्या मुकदम्यांत तशी " याद कोर्टात आपण मजकूर सांगून दुसऱ्या कडून "लिहवावी, आणि त्या यादीवर आपण सही करून " ती मुकदम्यांत ठेवावी." (सन १८५९ चा आक्ट ८ कलम १७२). फौजदारी कज्जांत दर एक साक्षीचा जबानी खाली माजि स्त्रेटाचा सहीची एक याद जोडिली पाहिजे, आणि तीत असे लिहिले पाहिजे, की " ही जबानी साक्षीदार अमुक भाषा ( तिचे नाव लिहून ) समजतो त्या भाषेत त्याजला "वाचून दाखविली, आणि, ही जबानी बरोबर "आहे, असे त्याणे कबूल केले असल्यास तेही "लिहिले पाहिजे. माजिस्टाने आपल्या हाताने साक्ष "लिहून घेतली नसल्यास, माजिस्टेटा समक्ष व त्याचा "ऐकण्यात येईल अशा रीतीने व तो जातीने सांगत "असतां व नजर ठेवीत असतां ती साक्ष लिहून घेतली,असे ही त्या यादीत लिहिले पाहिजे. " (सन १८६१ चा आक्ट २५ कलम १९५ तागाईत १९९ आणि ३६४ ).

 २५८. जिल्ह्यांत जी भाषा नेहमी चालत्ये त्या भाषेत साक्षीदाराची साक्ष साधारणतः लिहून घ्यावी, आणि कोणती भाषा चालवावी असा संशय जेथें