पान:प्रमाणशास्त्र.pdf/147

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१३८
साक्षीदारांचा जबान्या.

विचारास आला असतां सविस्तर लिहून घ्यावा. साक्षीदारास एकादा सवाल घातला असता त्यावर कोणत्याही पक्षकारानें अगर त्याचा वकिलाने आक्षेप घेतला असून तो घालण्यास जर कोर्टाने परवानगी दिली, तर तो सवाल व जबाब लिहून घेतला पाहिजे, आणि केलेला आक्षेप, व तो आक्षेप करणाराचे नाव, आणि त्यावर कोटाने केलेला निर्णय, ही जबानी घेत्ये वेळेस लिहून ठेविली पाहिजेत. हरएक साक्षीदार साक्ष देत असतां कसा वर्तला याविषयी जो मजकूर लिहून ठेविण्यास कोर्टास जरूर वाटेल तो कोर्टाने किंवा माजिस्लेटाने लिहून ठेवावा. ज्या मुकदम्यांत खुद न्यायाधीश (किंवा माजिस्लेट ) स्वतः जबान्या लिहून घेत नाही, त्या मुकदम्यांत हरएक साक्षीदाराची साक्ष चालली असतां तो साक्षीदार जो मजकूर सांगतो त्याचा सारांशाची याद न्यायाधीशाला लिहिणे जरूर आहे; आणि ती याद न्यायाधीशा. ने आपल्या हाताने लिहून तिजवर आपण स्वहस्ते सही केली पाहिजे. जा दिवाणी मुकदम्यांत अपील होत नाही, त्या मुकदम्यांतील साक्षीचा जबान्या सविस्तर लिहून घेण्याची गरज नाही. न्यायाधीशाने लिहिलेली सारांशाची याद बस आहे; आणि जा मुकदम्यांत सहा महिनेपर्यंत कैदेची शिक्षा देण्याचा माजिस्लेटास अधिकार आहे, त्या मुकदम्यांत सदरी सांगितलेल्या रीती प्रमाणे प्रत्येक साक्षीदार जो मजकूर सांगेल त्याचा सारांशाची याद माजिस्टाने लिहून ठेविली म्हणजे बस आहे; परंतु त्यास अधिक