पान:प्रमाणशास्त्र.pdf/146

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


साक्षीदारांचा जबान्या.

१३७

दुसऱ्या प्रतिवादीविरुद्ध कबूल करण्याचा इंग्लिश कोडताचा वहिवाटीस अनुसरण्यास इंडियांतील कोडते खुषी असतील, तर वरील प्रकार घडून येईल. सन १८६२ चा जानेवारी महिन्याचा ६ व्या तारिखेस लंडनांतील सेंट्रल फौजदारी कोडतांत, पेरी आणि पामर या दोन मनुष्यांवर एकाच वेळी खोटा कागद बनाविल्याचा आरोप आला होता; त्या कज्जांत पेरीने अपराध कबूल केला, आणि नंतर चौकशी चालत असतां पामरा विरुद्ध तिची (पेरीची) साक्ष घेण्यांत आली. या प्रकारचे मुकदमे आर्चबोल्ड् याणे सांगितले आहेत.

साक्षीदारांचा जबान्या घेण्याचा प्रकार.

 २५७. साक्षीदारांचा जबान्या घेण्याचा प्रकाराविषयीं दिवाणी व फौजदारी काम चालविण्याचा रीतीविषयींचा आक्टांतील ठराव बहुतकरून सारखे आहेत. दोन्ही बाबतीत पक्षकारांसमक्ष, किंवा त्यांपैकी जे हजर असतील त्यांसमक्ष, उघडे कोर्टात साक्ष घेतली पाहिजे; आणि फौजदारी खटल्यांत आरोपित मनुष्याला किंवा त्याचा मुखत्याराला फिर्यादी आणि साक्षीदार यांस प्रतिप्रश्न करण्याचा अखत्यार आहे. जबान्या न्यायाधीशासमक्ष आणि तो जा रीतीने सांगेल त्या रीतीने घेतल्या पाहिजेत. त्या हकीकतींचा रीतीने लिहाव्या; परंत विशेष कारणावरून, किंवा पक्षकाराने अगर त्याचा वकिलानें विनंती केली असल्यास, एकादा सवाल किंवा जबाब कोर्टाचा