पान:प्रमाणशास्त्र.pdf/145

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१३६
साक्षीदारांची लायकी.

आनरेबल कंपनीचा कोडतांत ती लायक आहे.

 बायकोला नवयाने वीष घालून तो मेली नसल्यास त्या स्वटल्यांत, किंवा तिला नवन्याचा हातून जुलूमजास्ती झाल्याबाबद, किंवा तिचापाशी जबरीने लग्न लाविल्याबाबद, फौजदारी प्रकरणांत नवऱ्यावि. रुद्ध साक्ष देण्यास बायको लायक साक्षीदार आहे.

 २५४. मुलाचा किंवा श्रमिष्ट मनुष्याचा लायकीचा किंवा गैरलायकीचा ठराव, त्या साक्षीदारास सत्यप्रतिज्ञा किंवा शपथ देण्यापूर्वी प्रश्न करून न्यायाधीशाने करावा; परंतु सत्यप्रतिज्ञा देऊन त्या साक्षीदाराची साक्ष चालली असतां, किंवा त्याजला प्रतिप्रश्न होत असतां, तो गैरलायक आहे, असे आढळल्यास, त्याची साक्ष दफ्तरांतून काढून टाकावी.

 २५५. सन १८३७ चा १९ व्या आक्टांत विशेबैंकरून असे ठरविले आहे, की कोणा एका मनुष्यावर कोणत्याही गुन्ह्याचा आरोप स्थापित झाला असेल, तथापि त्या सबबेनें तो गैरलायक साक्षीदार होणार नाही.

 २५६. एका कैदीने सांगितलेला अंगीकाराचा मजकर दुसऱ्याचा तरफेने किंवा दुसन्याचा विरुद्ध पुरावा होत नाही; तथापि फौजदारी काम चालवि. ण्याचा रीतीविषयी कायद्याचा २०९ व्या कलमान्वयें अपराधांत अंग असणान्या एकाद्या मनुष्याने साङ्केतिक माफी पत्करिली असतां तो लायक साक्षीदार होतो. परंतु त्याचा साक्षीवर थोडाच भरवसा ठेवितां यावा अशी ती असू शकेल; आणि एका प्रतिवादीने अपराध कबूल करून जाब दिला असेल त्याची साक्ष