पान:प्रमाणशास्त्र.pdf/144

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


साक्षीदारांची लायकी.

१३५

शाबीत करण्यास्तव बायकोचा साक्षीचा पुरावा बस नाही, परंतु ती प्रत्यंतरी पुराव्या प्रमाणे ग्राह्य आहे; आणि "आनुमानिक अपराधस्थापन करण्यास आणि " हवी तितकी मुखत्यारीने शिक्षेची आज्ञा करण्यास "बस आहे."

 २५३. सन १८६० साली खुनाचा आरोपावरून टेलिचरी एथे एका मनुष्याची चौकशी होऊन आगंतुक पुराव्याचा आधारासहित त्याचा बायकोचा साक्षीवरून त्याजवर अपराध स्थापित झाला. त्या अपराध्यास देहान्त दंड झाल्यावर, १८५२ चा आक्ट १५ कलम ३ अन्वयें नवऱ्या विरुद्ध साक्ष देण्यास बायको नालायक आहे, या सबबेवरून त्या आरोपस्थापनेत जा विद्वान् न्यायाधीशांनी आपलें संमत दिले त्यांची बरीच निंदा झाली. हा आक्ट बादशाही कोडतांतील साक्षीचा नियमाविषयी आहे, आणि जेव्हां तो आक्ट मंजूर झाला तेव्हां "बादशाही कोडते" या नावाखाली फौजदारी अदालत किंवा टेलिचरी एथोल कोडत ही मोडत नव्हती; आणि दुसरे असे, की फौजदारी प्रकरणांत त्या आक्टांत लिहिलेल्या कोणत्याही गोष्टी वरून नवन्याविरुद्ध साक्ष देण्यास बायको लायक साक्षीदार होणार नाही, म्हणून सदरील कलमांत ठराविलेलें आहे; परंतु ती गैरलायक आहे असे लिहिले नाही, म्हणून तो आक्ट मंजूर झाला नसता तर जशी तिची स्थिति असती तशीच राहिली आहे; तिजवरून अशा प्रकरणी बादशाहो कोडतांत साक्ष देण्यास बायको नालायक आहे, परंतु