पान:प्रमाणशास्त्र.pdf/143

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१३४
साक्षीदारांची लायकी,

" आणितां, त्या दोहों पैकी एकाची साक्ष दुसऱ्याचा " तरफेची किंवा विरुद्ध असली तरी ती मुळींच वर्ज " न करितां व ती हरकत त्या साक्षीचा लायकीस लागू " न करितां मान्यतेस लागू करावी, हा साधारण “नियम निर्भय आहे. जेथें दुसरा मजबूत पुरावा " असतो, तेथे अशा संबंधी मनुष्याचा साक्षीचा उ“पयोग करणे हे फार आक्षेप घ्यावयाजोगे आहे " असे उघड दिसून येईल.” (म० स० अ० सयुलर आर्डर् तारीख ४ मार्च सन १८३०. ) या प्रमाणे, गोडाई मलंगीचा कज्जांत कलकत्ता एथील निजामत अदालतीने सन १८४३ साली असा ठराव केला, की बायकोचा साक्षीवांचून अपराधस्थापना पुरता या कज्जांत पुरावा होता, सबब तिची साक्षी घेतली हे गैरवाजवी केले. कलकत्त्याचा निजामत अदालतीने सन १८५५ साली, पताशिया रेवानी बहारानी, या कज्नांत असा ठराव केला आहे, की आपल्या बायकोशी बदकमे केले, असा चार्ज नवऱ्याने तिसऱ्या मनुष्यावर आणिला असता, त्यांत आपल्या नवऱ्याचा वतीने बायको लायक साक्षी आहे; परंतु या कज्जांत त्या गुन्ह्याचा चार्ज प्रत्यक्ष बायको. वर आणलेला नव्हता. पुढे, तिची साक्ष खोटी आहे, असा पुरावा होऊन तिजवर खोट्या प्रतिज्ञेविषयों अपराधस्थापन झाले, या वरून अशा साक्षीवर साधारणतः किती थोडा भरवसा ठेवावा या विषयी ध्यानात येण्यास ही गोष्ट चांगल्या दाखल्याची आहे. मुसलमानी शास्त्रांत किशाविषयी दावा