पान:प्रमाणशास्त्र.pdf/142

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


साक्षीदारांची लायकी.

१३३

साक्ष देण्यास," आणि आपल्या कबजांतील किंवा "अखत्यारांतील कोणतेही दस्तऐवज हजर करण्यास” लायक आहे, व त्याकडून तसे करविण्यास अधिकारही आहे. सन १८६१ चा आक्ट २५ कलम १९३, १९४,२५० व ३६० यांत स्पष्टपणे असे ठरविले आहे, की फौजदारी चौकशीत फिर्यादीची साक्ष इतर साक्षीदारा प्रमाणे घेतली जाईल, आणि मद्रास फौजदारी अदालतीचा कोडताने तारीख २५ फेब्रुआरी सन १८२९ चा, व तारीख २७ जुलई सन १८३२ चा हुकुमांत असे दर्शविले आहे, की फौजदारी खटल्यांतील फिर्याद चालविणारास इनाम मिळण्याचा हक्क असला तथापि तो लायक साक्षीदार समजावा. (वायव्यमा न्तांतील निजामत अदालतीची सर्युलर आर्डर ८८ पहा )

 २५२. कलम २० या वरून सर्व दिवाणी मुदम्यांत नवराबायको एकमेकांचा तरफेने किंवा एकमेकांविरुद्ध, हक्काचे मजकूर खेरीज करून, साक्ष देण्यास लायक आहेत, असे समजावें; त्या हक्काचा मजकुराविषयी मागाहून लिहिण्यांत येईल. फौज. दारी खटल्यांत नवऱ्यावर किंवा बायकोवर तिसऱ्या मनुष्याने फिर्याद केली असता, त्यांत त्यांपैकी एक दुसन्याचा विरुद्ध लायक साक्षी समजला जाईल किंवा कसे, असा प्रश्न निघाल्यावरून मद्रासचा फो. जदारी अदालतीने असा अभिमाय दिला, की "हिंदु" स्थानांतील लोकांची हल्लीची स्थिति ध्यानी