पान:प्रमाणशास्त्र.pdf/141

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१३२
साक्षीदाराची लायकी.

किंवा स्याची धर्मावर अश्रद्धा असल्यामुळे, त्या मनुष्याची साक्ष शपथेवर किंवा ईश्वरस्मरणपूर्वक प्रतिज्ञेवर घेण्याची कोर्टाचा मते योग्य नसेल, तर, मी सत्य बोलेन व सर्व सत्यच बोलेन व सत्याशिवाय आणखी काही बोलणार नाही, अशी त्याजवळन नुसती प्रतिज्ञा करवून त्याची साक्ष किंवा अफिडेव्हिट व्यावी, असे सदरील आक्टाची कलमें १५, १६ व १७ यांत सांगितले आहे. सदरहु प्रकारचा कोणताही साक्षीदार बुझ्या खोटी साक्ष देईल, तर त्याणे खोटी प्रतिज्ञा केली असता त्याजला जी शिक्षा भोगावी लागती त्याच प्रमाणे ती शिक्षा भोगण्यास तो पात्र होईल; परंतु अशा खटल्यांत चार्जाचा कागद तयार करणें तो प्रसंगा प्रमाणे फिरवून तयार करावा.

 २५१. कलम १८ अन्वये, "मुकदम्यापासून हो"णाऱ्या परिणामाशी कोणा मनुष्याचा संबंध असल्यामुळे, " किंवा त्या मुकदम्यांतील पक्षकारांपैकी कोणत्याही पक्षकाराशी त्याचे नाते असल्यामुळे, तो मनुष्य त्या मुकदम्यांत साक्ष देण्यास नालायक होतो असे समजू नये; आणि त्यापुढील कलमांत असा ठराव केला आहे, की कोणत्याही दिवाणी मुकदम्यांतील, किंवा दिवाणी प्रकारचा इतर कामांतील कोणताही पक्षकार "त्या मुकदम्यांतील किंवा कामांतील पक्षकार नसता तर जा रीतीने तो साक्ष घेण्यास लायक "झाला असता,त्या रीतीने तो पक्षकार आपल्या तरफेने किंवा त्या मुकदम्यांतील अथवा कामांतील इतर "कोणत्याही पक्षकाराचा तरफेने साक्षीदारा प्रमाणे"