पान:प्रमाणशास्त्र.pdf/139

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१३०
साक्षीदारांस समाने.

धरून साक्षी देण्यास किंवा दस्तऐवज हजर करण्यास नाकबूल राहील, तर फौजदारी काम चालविण्याचा रीतीविषयी आक्टाचे कलम १६३ अन्वये त्याची तजवीज करावी. (सन १८५९ चा आक्ट ८ कलम १६९; इ० स० १८६१ चा आक्ट २५ कलम १९२,, ३६५ व १६३). सन १८५९ चा आक्ट ८ कलम १७० यांत खाली लिहिल्याप्रमाणे ठरविले आहे:

 "साक्ष देण्याकरितां अगर दस्तऐवज देण्याक. "रितां हजर होण्याविषयींचा हुकूम, चालत्या मुकदम्यातील कोणा पक्षकारास झाला असून, तो योग्य कारण नसतां त्या हुकुमा प्रमाणे हजर झाला "नाही, किंवा हजर झाला असून, अगर कोटीत आला असून, योग्य कारण नसतां, साक्ष देण्यास नाकबूल झाला, अथवा आपल्या हातांतील अगर ता"ब्यांतील वर लिहिल्याप्रमाणे समानांत सांगितलेला. "दस्तऐवज हजर करण्याविषयी कोर्टाने हुकूम केला "असतां तो हजर करण्यास नाकबूल झाला, तर हजर "न झालेल्या अगर नाकबूल झालेल्या पक्षकाराचा“विरुद्ध फैसल्ला करण्याचा, किंवा मुकदम्याविषयी "जो दुसरा कोणता हुकूम कोटास योग्य वाटेल तो "करण्याचा, कोर्टास अखत्यार आहे."

 २४८. सन १८५५ चा आक्ट २ कलम २२ अन्वयें मुकदम्यांत पक्षकार असणान्या साक्षीदाराचा कबजांत किंवा स्वाधीन जो दस्तऐवज असेल, आणि तो हजर करण्यास सांगणाऱ्या पक्षकाराचा पक्षास तो दस्तऐवज प्रासंगिक व मुद्याचा नसेल, तर तो