पान:प्रमाणशास्त्र.pdf/138

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


साक्षीदारांस समानें.

१२९

"प्रश्न केल्यास त्याचे उत्तर देण्यास तो नाकबूल हो"ईल, तर त्यास नुसत्या कैदेची शिक्षा दिली पाहिजे, "व ती कैद सहा महिने पर्यंत ठरविण्याचा अखत्यार "आहे; किंवा त्यास दंडाची शिक्षा दिली पाहिजे, व "तो दंड एक हजार रुपये पर्यंत करण्याचा अखत्यार "आहे; किंवा दोन्ही शिक्षा दिल्या पाहिजेत.” (पीनल कोड, कलम १७९ ).

 "कोणी लिहून दिलेल्या इकरारावर त्याला सही "करण्या विषयी हुकूम देण्याचा अधिकार कायद्याने "जा सरकारी नोकराला आहे तशा सरकारी नो"कराने कोणास त्याणे लिहून दिलेल्या इकरारावर "सही करण्याचा हुकूम केला असतां, तो सही कर"ण्यास नाकबूल होईल, तर त्यास नुसत्या कैदेची "शिक्षा दिली पाहिजे, व ती कैद तीन महिने पर्यंत "ठरविण्याचा अखत्यार आहे; किंवा त्यास दंडाची "शिक्षा दिली पाहिजे, व तो दंड पांचशे रुपये पर्यंत "करण्याचा अखत्यार आहे; किंवा दोन्ही शिक्षा दि"ल्या पाहिजेत. " ( पीनल कोड कलम १८०).

 २४७. हजर झालेला किंवा कोडतांत आलेला साक्षीदार, योग्य कारण नसतां, साक्ष देण्यास नाकबल होईल, किंवा आपल्या ताब्यांतील दस्तऐवज ह. जर करण्यास नाकबूल होईल, तर, जर ती गोष्ट माजिश्रेष्टाच्या हुकमतीत झाली असेल तर सात दिवसां. हुन अधिक नाही अशा कोत्याही मुदतीची कैद देण्याचा अधिकार माजिश्रेष्टाच्या आहे ; परंतु तो मुदत भरल्यावर जर तो साक्षीदार तसाच आग्रह