पान:प्रमाणशास्त्र.pdf/137

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२८
साक्षीदारांस समानें.


पाहिजे असल्यास, ती देण्याविषयी किंवा त्या वेळेस त्याजवळ किंवा त्याचा ताब्यांत एकादा दस्तऐवज असल्यास तो हजर करविण्याविषयी समनाशिवाय त्यास हुकूम करण्याविषयी कोटीस अधिकार आहे. परंतु असे दिसते, की त्या आक्टाने हाच अधिकार पक्षकारांस दिला नाही. एकाद्या हजर असलेल्या मनुष्यास समान झालेले नसतांही त्याची साक्ष घेण्याचा सेशन कोर्टास अखत्यार आहे (इ० स० १८६१चा आक्ट २५ कलम ३६७ ). आणि याचप्रमाणे त्याच आक्टाचा ३७५ कलमा अन्वयें आरोपित मनुष्यासही अखत्यार आहे.

 २४६.ज्या सरकारी नोकराला शपथ देण्याचा "अधिकार कायद्याने आहे, तशा सरकारी नोकराने "कोणास, खरा मजकूर सांगण्याविषयी शपथ घे, "असे सांगितले असतां, तो शपथ घेण्यास नाकबूल "होईल, तर त्यास नुसत्या कैदेची शिक्षा दिली पाहिजे, व ती कैद सहा महिने पर्यंत ठरविण्याचा अखत्यार आहे; किंवा त्यास दंडाची शिक्षा दिली पाहिजे, व तो दंड एक हजार रुपये पर्यंत करण्याचा "अखत्यार आहे; किंवा दोन्ही शिक्षा दिल्या पाहिजेत." ( पीनल कोड कलम १७८ ).

 "कोणी सरकारी नोकराला कोणत्याही गोष्टीविषयी खरा मजकूर सांगणे कोणा मनुष्यास काय द्याने भाग असून, त्या गोष्टीविषयी त्या सरकारी "नोकराने आपणाला कायद्याने जो अधिकार मिळाला आहे तो चालवीत असतां त्या मनुष्यास कांहीं