पान:प्रमाणशास्त्र.pdf/136

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


साक्षीदारांस समानें

१२७

 कला भाग असतां, तो बुद्धिपूर्वक गैरहजर
 "राहतो, तर कनें या कलमांत सांगितलेला अपराध
 केला." ( पीनल कोड कलम २७४ )

 २४४. सन १८५९ चा आक्ट ८ कलम १६१ तागाईत १६५ यां अन्वयें दाव्यांतील दुसऱ्या कोणत्या पक्षकाराने अर्ज केला असून, तसा अर्ज करण्यास पुर्ती कारणे आहेत, अशी कोर्टाची खातरी केल्यास, दुसऱ्या पक्षकारांस साक्ष देण्याकरितां समान करण्याचा अखत्यार आहे. पक्षकारास एकदम समान करण्याचा किंवा त्याणे हजर होऊन साक्ष का देऊ नये, याविषयी कारण दाखविण्यास्तव त्याजला प्रथमतः नोटीस करण्याचा अखत्यार कोर्टास आहे. सदरहु आक्टाचा १६६ व्या कलमावरून चौकशी चालत असतां, कोणत्याही वेळी आपल्या स्वतांचा इच्छेने पक्षकारांस समान करून साक्षी प्रमाणे साक्ष घे. ण्याचा. किंवा त्याचा हाती अगर ताव्यांत जो दस्त. ऐवज असेल तो आणविण्याचा अधिकार कोर्टास आहे. आणि, सन १८६१ चा २३ व्या आक्टान्वयें, एकादा मनुष्य पक्षकार नसतांही त्याजला समान करण्याचा अधिकार कोडतास आहे. फौजदारी काम चालविण्याचा रीतीविषयी आक्टाचे कलम २६३ , २०१ व ३३७ अन्वये फौजदारी कोर्टास साक्षीदारांस समान करण्याविषयी अविच्छिन्न अधिकार आहे.

 २४५. सन १८५९ चा आक्ट ८ कलम १७१ यावरून,एकादा मनुष्य,मुकदम्यांत पक्षकार असो अगर नसो, तो कोडतांत प्रत्यक्ष हजर असून त्याची साक्ष