पान:प्रमाणशास्त्र.pdf/135

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१२६
साक्षीदारांस समानें.

"होणे कायद्याने भाग असतां तो बुद्धिपूर्वक त्या ठिका“णी अगर त्या वेळेस गैरहजर राहील, किंवा जा "ठिकाणी हजर राहणे त्याला भाग आहे त्या ठिकाणा"पासून जा वेळेस जाणे कायद्याने वाजवी आहे, "त्याचा अगोदर जाईल, तर त्याला नुसत्या कैदेची "शिक्षा दिली पाहिजे, व तो कैद एक महिना पर्यंत "ठरविण्याचा अखत्यार आहे; किंवा त्यास दंडाची "शिक्षा दिली पाहिजे, व तो दंड पांचशे रुपये पर्यंत "करण्याचा अखत्यार आहे; किंवा दोन्ही शिक्षा दि"ल्या पाहिजेत; किंवा जातीने अगर मुखत्याराचा "मारफतीने न्यायाचा कोर्टात हजर होण्याविषयी ते "समान, अगर नोटीस, अगर हुकूम, अगर जाहिरात "असली तर त्यास नुसत्या कैदेची शिक्षा दिली पाहि"जे, व ती कैद सहा महिने पर्यंत ठरविण्याचा अखत्यार "आहे; किंवा त्यास दंडाची शिक्षा दिली पाहिजे, व "तो दंड एक हजार रुपये पर्यंत करण्याचा अखत्यार "आहे; किंवा दोन्ही शिक्षा दिल्या पाहिजेत."

उदाहरणे.

 (१) "कलकत्यांतील सुप्रीम कोर्टाने "सप्पीना ( म्ह० समान ) केल्यावरून, त्या को. "टीत हजर होणे कला कायद्याने भाग असतां, "तो बुद्धिपूर्वक गैरहजर राहतो, तर कनें या "कलमांत सांगितलेला अपराध केला."

 (२) "जिल्हा जज्जाने समान केल्यावरून "त्याचा कोर्टात साक्षी देण्याकरितां हजर होणे.