पान:प्रमाणशास्त्र.pdf/134

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.




साक्षीदारांस समाने

१२५

"जाहीर करण्या विषयी हुकूम करण्याचा आपल्या "सरकारी नोकरीचा नात्याने जास कायद्याने अधिकार आहे अशा सरकारी नोकराने काही गोष्ट दंवडी "पिटवून कायद्याप्रमाणे जाहीर करण्याचा हुकूम केला "असतां त्यास बुद्धिपूर्वक प्रतिबंध करील, तर त्यास "नुसन्या कैदेची शिक्षा दिली पाहिजे, व ती कैद एक "महिनापर्यंत ठरविण्याचा अखत्यार आहे, किंवा त्यास "दंडाची शिक्षा दिली पाहिजे, व तो दंड पांचशे रुपये “पर्यंत करण्याचा अखत्यार आहे, किंवा दोन्ही शिक्षा दिल्या पाहिजेत; किंवा ते समान, अगर नोटीस,"अगर हुकूम, अगर जाहिरात, न्यायाचा कोर्टात, "जातीने किंवा मुखत्याराचा मारफतीने हजर होण्याविषयी, किंवा दस्तऐवज हजर करण्याविषयी असली, "तर नुसत्या कैदेची शिक्षा त्यास दिली पाहिजे, व ती "कैद सहा महिने पर्यंत ठरविण्याचा अखत्यार आहे; "किंवा त्यास दंडाची शिक्षा दिली पाहिजे, व तो दंड "एक हजार रुपये पर्यंत करण्याचा अखत्यार आहे; "किंवा दोन्ही शिक्षा दिल्या पाहिजेत." (पीनलू कोड, कलम १७३).

 "समान, अगर नोटीस, अगर हुकूम अगर जा"हिरात, करण्याचा आपल्या सरकारी नोकरीचा "नात्याने जाला कायद्याने अधिकार आहे, अशा सर"कारी नोकरानें कोणाला जातीनें अगर मुख्त्याराचा "मारफतीने अमुक ठिकाणी अमुक वेळी हजर होण्या. "विषयी, समान, अगर नोटीस, अगर हुकूम, अगर "जाहिरात केली असून, त्यावरून त्याला तेथे हजर