पान:प्रमाणशास्त्र.pdf/133

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१२४
साक्षीदारांस समाने.

"केलेले समान, अगर नोटीस,अगर हुकूम, आपणावर " बजाविला जाऊंनये, म्हणून कोणी मनुष्य छपून " बसेल, तर त्यास नुसत्या कैदेची शिक्षा दिली पाहिजे, व ती कैद एक महिनापर्यंत ठरविण्याचा अखत्यार आहे, किंवा त्यास दंडाची शिक्षा दिली " पाहिजे, व तो दंड पांचशे रुपयेपर्यंत करण्याचा "अखत्यार आहे, किंवा दोन्ही शिक्षा दिल्या पाहिजेत; किंवा जर ते समान, अगर नोटीस, अगर हुकूम, जातीने किंवा मुखत्याराचा मारफतीने न्याया" चा कोर्टात हजर होण्याविषयों किंवा दस्तऐवज "हजर करण्याविषयी असला, तर त्यास नुसत्या "कदेची शिक्षा दिली पाहिजे, व ती कैद सहा महि. “नेपर्यंत ठरविण्याचा अखत्यार आहे, किंवा त्यास "दंडाची शिक्षा दिली पाहिजे, व तो दंड एक हजार रु"पयेपर्यंत करण्याचा अखत्यार आहे, किंवा दोन्ही " शिक्षा दिल्या पाहिजेत.” ( पीनल कोड, कल. म १७२).
 "समान, अगर नोटीस, अगर हुकूम, आपल्या "सरकारी नोकरीचा नात्याने करण्याचा जाला कायद्याने अधिकार आहे, अशा सरकारी नोकराने केलेले समान, अगर नोटीस, अगर हुकूम, आपणावर "किंवा दुसऱ्या कोणावर बजाविण्यास कोणत्याही "रीतीने बुद्धिपूर्वक कोणी प्रतिबंध करील, किंवा तसे "समान, अगर नोटीस, अगर हुकूम, कोणत्याही ठि"काणावर कायद्याप्रमाणे डकविण्यास बुद्धिपूर्वक प्रतिबंध करील, किंवा काही गोष्ट दंवडी पिटवून