पान:प्रमाणशास्त्र.pdf/132

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



साक्षीदारांस समाने.

१२३

"हजर होण्याविषयी जाहिरनाम्यांत लिहिले होते " त्या वेळी व त्या ठिकाणी हजर होण्यापुरता अव"काश राहून मला जाहिरनाम्याची माहिती झाली " नव्हती, अशी कोर्टाची खातरी केली तर मालाची " जप्ती खुली करावी; आणि जप्तीचा खर्चाबदल जो "हुकूम योग्य वाटेल तो करावा.” जर तो साक्षीदार हजर न होईल, किंवा हजर न होण्याचे कारण दाखवून कोर्टाची खातरी न करील, तर त्या जप्नीबदल खर्च आणि पीनल कोडाचा १७२व्या कलमा अन्वये पळून गेल्याबदल जा दंडास तो साक्षीदार पात्र असेल तो दंड भागविण्याकरितां त्या मालाची विकरी करण्याचा अखत्यार आहे; परंतु जर त्या साक्षीदाराने तो खर्च आणि दंड कोटीत भरला तर मालाची जप्ती खुली केली पाहिजे (इ. स. १८५९ चा आक्ट ८ क. १६०, आणि इ.स. १८६१चा आक्ट २५ कलम १९०). "कोणत्याही मनुष्यास केवळ दस्तऐवज हजर कर" ण्याविषयी समान केले असल्यास, त्याणे दस्तऐवज " हजर करण्याकरितां खुद हजर नहोतां तो दस्तऐ"वज हजर करविला, तर त्याणे समान मान्य केलें " असे समजावें." (इ. स. १८५९ चा आक्ट ८ कलम १५३).

 २४३. या बाबतीविषयीं पीनलू कोडाचा १० व्या बाबत खाली लिहिलेला मजकूर लिहिला आहे: "समान, अगर नोटीस, अगर हुकूम, आपल्या “सरकारी नोकरीचा नात्याने करण्याचा जाला "कायद्याने अधिकार आहे, अशा सरकारी नोकराने