पान:प्रमाणशास्त्र.pdf/131

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१२२
साक्षीदारांस समाने


न पाठवितां प्रथमतःच वारंट पाठविण्याचा अखत्यार आहे. इसवी सन १८५९ चा आक्ट ८ कलम १६८, आणि इसवी सन १८६१ चा आक्ट २५ कलम १८८ आणि १९१.

 २४१. साक्ष देण्याकरितां किंवा दस्तऐवज हजर करण्याकरितां हजर होण्याविषयी साक्षीदारास हुकूम केला असून तो साक्षीदार समान किंवा वारंट चुकविण्याचा बुद्धीने पळून गेला असेल, अगर छपून बसला असेल, (आणि दिवाणी मुकदम्याचा बाबतीत त्याचा साक्षीची किंवा दस्तऐवजाची जरूर आहे असा पुरा. वा होईल, ) तर त्या मनुष्याने अमुक ठिकाणी, अमुक वेळी, साक्ष देण्याकरितां हजर व्हावे, असा जा. हिरनामा लिहून तो त्या मनुष्याचा घरावर डकविण्याविषयी हुकूम करण्याचा अखत्यार कोर्गस आहे; आणि त्या वेळी व त्या ठिकाणी तो मनुष्य हजर झाला नाही, तर, कोर्यस योग्य वाटेल तितक्या किमतीचा त्याचा स्थावरजंगम माल जप्त करण्याचा अखत्यार कोर्टास आहे. परंतु जमीचा खर्च, व गैरहजेरीकरितां जा दंडास तो पात्र होणे असेल तो दंड, यांचा रकमेहून अधिक किमतीचा माल जप्त करूं नये, (सन १८५९ चा आक्ट ८ कलम १५९, १६० व १६८; आणि इ० स० १८६१ चा आक्ट २५ कलम १८९; व या ग्रंथाचे कलम २४७ पहा).

 २४२. “ त्या साक्षीदाराने हजर होऊन, मी “समान चुकविण्याकरितां पळून गेलो नाही, अगर "छपून बसलो नाही, आणि जा वेळी व जा ठिकाणी