पान:प्रमाणशास्त्र.pdf/130

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१२१

साक्षीदारांस समानें.
आणि ती सर्व प्रकारे समानां प्रमाणे मानली पाहिजेत.

 सरकारी नोकराने हजर होण्याविषयी तारीख नेमणे ती, त्या नोकरास कोणत्या तारखेस हजर होण्यास परवानगी होईल, त्याविषयी त्या खात्यांतील मुख्यास विचारून कोडताने नेमावी.

सरकारी कचेरीतील हाताखालचा मनुष्यास सरकारी कागद हजर करण्याविषयी समान करूं नये. असे कागद साक्षीत पाहिजे असल्यास कोडताने कलेकटरास किंवा खान्याचा इतर मुख्यास कागद पाठविण्याविषयी लिहावें (सन १८५९ चा आक्ट ८ कल. म १३८).

 चालेपर्यंत समान खुद साक्षीवर बजवावे; परंतु तो सांपडत नसेल तर त्याचा कुटुंबांतला त्याचा घरी राहणारा कोणीही जाणता पुरुष असेल त्याजवळ तें समान देऊन बजवावें; (दिवाणी काम चालविण्याचा रीतीविषयींचा आक्ट कलम १५५, फौजदारी काम चालविण्याचा रीतीविषयींचा आक्ट क. लम १८७).

  २४०. साक्षीदारास योग्य रीतीने समान लागले असून योग्य कारण दाखविल्यावांचून समान मान्य करण्यास जर तो चुकवील, तर त्यास वारंटाने पकडून कोडतापुढे आणण्याचा अखत्यार आहे. आणि, " साक्षीदार याजवर साक्ष देण्यास सक्ती केल्यावां"चून तो हजर होणार नाही," असे मानण्यास माजिरेटास कारण दिसले तर त्याजला समान