पान:प्रमाणशास्त्र.pdf/129

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



१२०
साक्षीदारांस समाने करण्याविषयी.

 २३९. पक्षकार आणि साक्षीदार यांस हजर करण्याचा बंदोबस्ताचा रीतीविषयी बारकाईने तपशील सांगणे हा या लहान ग्रंथाचा आशय नाही. साक्षीदारास समाने करण्याविषयींचा नियम जसा दिवाणी कामांत आहे त्या प्रमाणेच बहुतकरून फौजदारीत आहे. हा नियम दिवाणी आणि फौजदारी काम चालविण्याचा रीतीविषयींचा आक्टांत आढळतो. साक्षीदारास हजर करण्याविषयींचा प्रत्येक समानांत कोणत्या वेळी व कोणत्या ठिकाणी तो हजर झाला पाहिजे, आणि मुकदम्यांत साक्ष देण्याकरितां किंवा दस्तऐवज हजर करण्याकरितां हजर झाला पाहिजे, या गोष्टी लिहिल्या पाहिजेत, आणि जर दस्तऐवज हजर करण्याचा असेल, तर जो दस्तऐवज हजर करावयाचा त्याचे वर्णन लिहिले पाहिजे; आणि मुकदम्यांतील पक्षकारांची नांवें लिहिली पाहिजेत (सन १८५९ चा आक्ट ८ कलम १५२, व सन १८६१ चा आक्ट २५ कलम १८७).

 मोठ्या पदवीचा मनुष्यांस कारणावांचन समाने करण्यात येऊ नये. त्यांणी हजर व्हावे असे जरूर असल्यास त्यांस सन १८५९ चा आक्ट ८कलम६४ व ६५ अन्वयें समाने न करितां पत्रे लिहिण्याचा कोडतास अखत्यार आहे; ती पत्र न्यायाधिशाचा सहीशिक्यानिशी असली पाहिजेत; आणि त्या पत्रांत, समनांत जो मजकूर असावयाचा तो असला पाहिजे,