पान:प्रमाणशास्त्र.pdf/128

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



वैद्यांचा जबान्या वगैरे.

११९

'दिसल्यास, त्या सहीला, अगर त्या मनुष्याला तो हु"द्दा आहे या गोष्टीला, प्रमाण नलगे."

 २३८. अशा बाबतीत सार्वजनीन सोईचा सबबेने मात्र कर्णोपकर्णी पुरावा घेणे निर्दोष होते. हिदुस्थानांतील लोकांची हल्लीची अवस्था विलक्षण आहे म्हणून अशा डाक्टरांचा साक्षी घेणे योग्य होऊ; परंतु त्या लोकांची जसजशी सुशिक्षितावस्था वाढत जाईल, आणि वैद्यांची संख्या जसजशी वाढेल, त्याप्रमाणे या कायद्यांत फेरफार होईल असें वाटते. रसायन शास्त्राचा आधाराने परीक्षा करणारा जो अम्मलदार असतो, तो हमेशा सरकारचा चाकरीत असतो, आणि हिंदुस्थानांतील विद्वान् वैद्यही बहुधा सरकारी नोकर असतात; व त्यांजवर जबाबदारीची कामें सोंपलेली असल्या कारणाने लोकांस गैरसोय झाल्यावांचून त्यांस वारंवार समान करितां येणार नाही. सरकारी नोकरीत असणाऱ्या वैद्यांवर जबाबदारी असत्ये, व तिचे वजन जरी शपथेपेक्षा काही अंशी कमी असते, तथापि तिचा योगाने त्यांजपेढे ठेवलेल्या प्रकरणांत लक्षपूर्वक चौकशी आणि यथार्थ व्याख्या करण्यास साधारणतः त्यांची प्रवृत्ति व्हावी अशी ती जबाबदारी असत्ये, हेही लक्षात ठे. विले पाहिजे. आणि माजिस्लेटासमोरील वैद्याचा साक्षीचा बाबतीत ती चौकशी शपथेवर किंवा प्रतिज्ञेवर झाली आणि त्या वैद्यास आरोपित मनुष्याने प्र. तिप्रश्न करण्याची सवड होती, असे अनुमान करतां येईल.