पान:प्रमाणशास्त्र.pdf/127

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



११८
कर्णोपकर्णी पुरावा.


९ वैद्यांचा जबान्या वगैरे.

 २३६. फौजदारी काम चालविण्याचा रीतीविषयी नव्या आक्टांत खाली लिहिल्याप्रमाणे लिहिले आहे; कलम ३६८:“सिव्हिल सर्जन, म्हणजे "सिव्हिल खात्याचा डाक्टर, अगर दुसरा कोणी वैद्य "याची साक्ष माजिस्टाने घेऊन त्या जबानीवर रीती "प्रमाणे सहीनिशी खरेपणाचा शेरा लिहिला अस"ल्यास, ती जबानी कोर्टाने प्रथमदर्शनी पुराव्यास "घेतली पाहिजे. परंतु त्या सिव्हिल खात्याचा डा"क्टरास अगर त्या दुसऱ्या वैद्यास समान करून आ"णण्याविषयी कोर्टात पुरते कारण दिसले, तर त्यास “समान करण्याचा अखत्यार कोर्टास आहे."

 २३७. त्याच आक्टाचे कलम ३७०:- "एका"या फौजदारी खटल्याची चौकशी चालली असतां, "किंवा त्या चौकशीचा पूर्वी करावयाचा जो तपास "तो चालला असतां, रसायनशास्त्राचा आधाराने प. "रीक्षा करणारा सरकारी कामगार याजकडे परीक्षा "करून अगर मूलतत्त्वांचे शोधन करून रिपोर्ट करा. "वयाकरितां कांही पदार्थ अगर कांहीं वस्तु रीती प्र. "माणे पाठविल्यावरून त्या पदार्थाविषयीं अगर त्या "वस्तूविषयी त्याणे केलेला रिपोर्ट, या मजकुराचा "कांहीं दस्तऐवज, त्याजवर त्या परोक्षा करणाराची "सही असल्यास, चौकशीचा वेळेस सेशन कोर्टाने "पुराव्यास घेतला पाहिजे. आणि तो दस्तऐवज ख"रा आहे याविषयी संशय घेण्यास कोर्टाला कारण न