पान:प्रमाणशास्त्र.pdf/126

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


अंतकाळची साङ्केतिक बोलणी.

११७

"उदाहरण,घडलेली गोष्ट सोडून केवळ अभिप्रायाविष“यींचें साङ्केतिक बोलणे ग्राह्य होणार नाही."

 २३३. जेथे बनूं शकेल तेथें अंतकाळचें साङ्के. तिक बोलणे माजिस्टाने आरोपित मनुष्यासमक्ष शपथेवर लिहून घ्यावे, आणि ते बोलणारास प्रतिप्रश्न करण्याविषयी आरोपितास परवानगी द्यावी, हे बरें आहे; परंतु, सन १८६१ चा २५ व्या आक्टाचा ३७१ कलमा अन्वये असे करणे जरूर आहे असें नाहीं "अंतकाळचे साङ्केतिक बोलणे मरणारास प्रश्न करू"न त्याकडून बोलविले, अशी हरकत चालणार "नाही."

 २३४. अंतकाळचे साङ्केतिक बोलणे आरोपित मनुष्याचा तर्फे किंवा त्याचा विरुद्ध सारखेच कबूल करण्यांत येते.

 २३५. अंतकाळचा साङ्केतिक बोलण्याची योग्यता तोलून पाहतां खाली लिहिलेल्या गोष्टींचा वि. चार केला तर बरे पडेल; (१)साक्षीदारांनी त्या साकेतिक बोलण्याविषयीं याथातथ्य मजकूर सांगितल्याचा संभव आहे किंवा नाहीं; (२)ज्या गोष्ट घडत आली तिच्याविषयी स्पष्ट विचार करणारास बहुत करून झाला होता, किंवा हाणामारीचा गोंधळांत किंवा संतापाने तो चुकला असेल किंवा कसें; (३)आरोपित मनुष्याविषयी त्याचा मनांत दुशमनी किंवा कवासना होती की काय; आणि (४)जबानी देणारास प्रतिप्रश्न करण्याची आरोपित मनुष्यास सबड होती की काय?