पान:प्रमाणशास्त्र.pdf/125

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


११६
कर्णोपकर्णी पुरावा.

आवश्यक आहे; कारण, जर काही वेळपर्यंत मी मरत पडून वांचेन, असे त्यास वाटत असल्यास त्याचा मनाची स्थिति निराळी असूं शकेल.

 २३१. अंतकाळचे साङ्केतिक बोलणे फौजदारी कज्जांत ग्राह्य आहे; आणि त्यांतील चार्ज खून किंवा मनुष्यवध याजविषयी असला पाहिजे; आणि त्या कज्नांतील मरणाराचा मरणाचा हकीकती, किंवा कारणे, किंवा मरणमद दुखापती, यां प्रकरणी ते साङ्केतिक बोलणे असले पाहिजे; आणि मरणाविषयी हकीकती किंवा कारणे यां पेक्षा काही जास्ती शाबीत करण्याकरितां तें साङ्केतिक बोलणे कबूल केले जात नाहीं; उदाहरण, खोटी प्रतिज्ञा, किंवा गर्भपात करणे, किंवा जबरीची चोरी ही मरणाशी सलग्न असली तथापि त्यांजविषयी एकादा कैदी अपराधी आहे, असे शाबीत करण्यास अंतकाळची साङ्केतिक बोलणी कबूल केली नाहीत. या यत्ता सन १८६१ चा २५ व्या आक्टाचा ३७१ व्या कलमांत आढळत नाहीत हे खरे आहे; परंतु, या आक्टाची, सन १८५५ चा आक्ट २ रा कलम २९ याशी तुळणा करून पाहतां, जा मनुष्यास रोगनिवारणाची आशा असत्ये त्याचा बाबतीत जे नियम पूर्वी चालू होते, ते वाढविण्याचा वरील २५ वा आक्ट करणारांचा इरादा होता असे दिसते.

 २३२. आणखी, " मरणाराने सांगितलेला मज"कूर असा असला पाहिजे की, जर तो जीवंत असून "जबानी देता, तर तीत तो ग्राह्य झाला असता.