पान:प्रमाणशास्त्र.pdf/124

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



अंतकाळची साङ्केतिक बोलणी.

११५

अंतकाळी बोलला असेल, ते बोलत्ये समयी त्यास,मो जवळ ठाकलेल्या मरणाचा भीतीत आहे, असे वाटले पाहिजे, हे अवश्य जरूर आहे; आणि इंग्लंडांतील कामन् ला प्रमाणे, मी बरा होईन, अशी त्यास आशा नसली पाहिजे असे दिसते. परंतु सन १८५५ चा दुसन्या आक्टाचा २९ व्या कलमांत असे लिहिले आहे की, "अंतकाळची साङ्केतिक बोलणी पुरा"व्यास दिली असतां, ती बोलत्ये समयीं मैयत मनु"ज्याचे मरण जवळ आले आहे अशी त्यास भीति "होती, आणि जरी ती बोलत्ये वेळी बरे होण्याची "अशा तो करीत होता, तथापि मरण जवळ आ"ल्याची भीति स्वतः त्यालाही वाटत होती.” (सन १८६१ चा २५ व्या कायद्याचे ३७१ वे कलमही पहा).

 २२९. परंतु आपल्या येण्याच्या मरणाविषयी आपला उमज, ते साङ्केतिक बोलणे बोलणाऱ्या मनष्याने शब्दांनी उघड करून दाखविला पाहिजे, असे आवश्यक नाही. सदरहु भीतीविषयी त्याचा उमज त्याचा वर्तणुकेवरून आणि त्या बाबतीचा सर्व हकीकतींवरून अनुमित करता येईल.

 २३०. साङ्केतिक बोलणे बोलत्ये वेळी त्या बोलणारास, आपण स्वतः बहुत करून तत्काळीच मरण्याचा भीतीत आहों, असे वाटले असल्यास त्यानंतर कितीही अवकाशाने खरोखर मरण प्राप्त झाले असले तरीही काही चिता नाही. परंतु, मला लौकर मरण येईल, असे त्या बोलणारास वाटत असले पाहिजे, हे